महाराष्ट्र

आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

मुंबईदि.19 : आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती त्यांनी आज केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या अनुषंगाने मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याज देखील माफ करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली आहे. 

Most Popular

To Top