मुंबई, दि. 19 : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती दिलखुलास कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलेले हे आवाहन राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शुक्रवार, दि. २० मार्च रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. न्युज ऑन एअर ॲपवरूनही हा संवाद सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होणार आहे.
००००