महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा; सुरक्षितता आणि आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन

मुंबई, दि. 24: उद्या हिंदु नव वर्षाचा प्रारंभ होत असून या दिवशी घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारली जावी. संयम, स्वयंशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी. यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करावा, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच उंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे. यातून प्रेरणा घेऊन आपणही कोरोनारुपी  संकटावर मात करू, गर्दी न करता घरगुती स्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच, यापुढेही शासनाच्या उपाययोजनांना  कृतिशील साथ द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

Most Popular

To Top