महाराष्ट्र

कोरोनाबाधित व्यक्तींना राज्यपालांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीला दिले एक दिवसाचे वेतन

राजभवनातील कर्मचारीही देणारएक दिवसाचे वेतन

मुंबई, दि. २६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनकडून आज जाहीर करण्यात आले.

राज्यपालांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १४ एप्रिलपर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरीता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असे आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.

००००

Most Popular

To Top