महाराष्ट्र

जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. 27 : प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देण्याचे काम संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 

प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून दादी जानकी यांनी भारतासह अनेक देशात कार्य केले. जगाला सुखी, समाधानी करण्यासाठी त्यांनी मानवतेचा मंत्र दिला. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी होते. स्वच्छ भारत मिशनच्या ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर म्हणून त्यांनी काम केले. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेसह त्यांच्या अनुयायांच्या मार्गदर्शक हरपल्या असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. 

Most Popular

To Top