महाराष्ट्र

ब्रह्मकुमारी दादी जानकी स्थितप्रज्ञ व्यक्ती होत्या : राज्यपाल


मुंबई दि.२७ – ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख दादी जानकी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ब्रम्हकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक प्रमुख राजयोगिनी दादी जानकी या स्थितप्रज्ञ, संतप्रवृत्तीच्या प्रेमळ व्यक्ती होत्या. दादीजींना प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य मला लाभले. ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक देशात सेवाकार्य केले. अमोघ वाणी लाभलेल्या दादीजींनी देश विदेशातील असंख्य लोकांना उन्नत जीवन जगण्याचा राजमार्ग दाखवला. त्यांचे विचार व प्रवचने मानवजातीला नेहमी मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या निधनामुळे ब्रह्मकुमारी संस्थेची तसेच मानवतेची हानी झाली आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

Maharashtra Governor condoles

demise of Dadi Janki

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed grief over the demise of the administrative head of Brahmakumaris Dadi Janki. In a condolence message, Governor Koshyari said:

I had the honour and privilege of meeting Rajyogini Dadi Janki, the Spiritual Head of Brahmakumaris. She was a saintly person, acknowledged for her stable mind. Through ‘Brahmakumaris’, she guided and implemented humanitarian projects in several countries. Gifted with excellent oratory, Dadiji inspired millions of people to lead a purposeful life. Her thoughts and discourses will continue to inspire people for many more years. Dadiji’s demise is a great loss to Brahmakumaris as indeed to humanity.

Most Popular

To Top