महाराष्ट्र

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट

मुंबई, दि. 28 – सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 झाल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयास भेट देऊन उपचाराबाबत माहिती घेतली.

त्यांनी त्यावेळी सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांची तातडीने बैठक घेतली.

बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून नवीन 125 खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी  यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Most Popular

To Top