महाराष्ट्र

रामनवमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा; प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव घरीच साजरी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्याला आपल्या घरीच भक्तीभावाने साजरा करायचा आहे. प्रभू रामाचे उन्नत जीवन व उच्च आदर्श मानव जातीला नेहमीच योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देत राहतील. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

 0000

Governor greets people on Ram Navmi

Governor Bhagat Singh Koshyari has greeted the people on the occasion of Ram Navmi.

MUMBAI, 1 April : Ram Navmi is an occasion to celebrate with enthusiasm the birth of Maryada Purshottam Prabhu Ram. However, we are passing through an extremely challenging situation this year. We must therefore celebrate Ram Navmi with devotion staying at our homes. May the noble life and ideals of Prabhu Ram continue to inspire mankind on the righteous path. I extend my greetings to all on the auspicious occasion of Ram Navmi, said the Governor in his message.

Most Popular

To Top