महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


मुंबई, दि. 3 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपतींना अभिवादन करताना म्हणाले की, महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. संकटकाळात डगमगून न जाता आव्हानांचा सामना कसा करायचा याचा धडा महाराजांनी घालून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपला महाराष्ट्रही कोरोनाच्या संकटावर यशस्वीपणे मात करेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

000000

Most Popular

To Top