“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची” स्थापना, संस्थापक व चिन्ह जाणून घ्या संपूर्ण माहिती
महासत्ता :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. स्थापना १० जून, १९९९ रोजी झाली असून या पक्षाचे मुख्यालय १०, बिशंबर दास मार्ग,नवी दिल्ली – ११०००१ आहे . संयुक्त पुरोगामी आघाडी मधील हा घटक पक्ष असून
लोकसभेमधील जागा 5 खासदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान कॉंग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय कॉंग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.
पक्षाचे चिन्ह
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.