दहावीनंतरचे शिक्षण लग्नानंतर पूर्ण करून, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मगावत आहेत प्राचार्य
मुंबई : बीड सारख्या ग्रामीण भागात लग्नानंतर दहावी व बारावीच शिक्षण पूर्ण करून न थांबता एम.ए. बी.एड च शिक्षण पूर्ण करून राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्म गाव असलेल्या सावरगाव येथेच प्राचार्य झालेल्या भगवान बाबा च्या या कन्येचा संघर्षमय जीवनप्रवास त्याग आणि समर्पणातून उभा राहिला आहे.
बीड सारख्या दुष्काळी भागात शिक्षण संस्थेचे जाळे उभा करणारे सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर यांच्याशी सत्यभामाताई बांगर यांचा विवाह झाला बांगर यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी चक्क बांगर ताईंना लग्नानंतर पुढील शिक्षण घ्यायला साथ दिली. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रसंत भगवान बाबाचा एकर विका पण मूल शिकवा हा मूल मंत्र सत्यभामाताई बांगर यांनी आपल्या आयुष्यात आणला. सावरगाव येथे प्राचार्य म्हणून त्या कार्यरत आहेत.
सत्यभामा ताई इथेच थांबल्या नाहीत पाटोदा तालुका दूध संघाच्या त्या चेअरमन झाल्या. तालुका व परिसरातील दूध उत्पादकांना शेतीला जोडधंदा उपलबध्द करून देत त्यांनी दूध संघा मार्फत अनेक शेतकऱ्यांना मदत केली.
प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शिक्षण संस्था उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मूळ पाटोदा तालुक्यातील भायाळा गावातील सत्यभामा ताईंनी गावातून शिक्षण संस्थेचे जाळे विणले ते संपूर्ण बालघटच्या डोंगरमाथ्यावर ग्रामीण भागात त्या शिक्षणाची गंगा घेऊन गेल्या. प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव म्हणून त्या आजही जबाबदारी पार पाडत आहेत .
क्रमशः