मुख्य बातम्या

श्री संत “भगवानबाबा ” , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्रीची लेक कोण?

श्री संत “भगवानबाबा ” , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्रीची लेक कोण?

पुणे : श्री संत भगवानबाबा यांनी मागासलेल्या विशेषतः “वंजारी” समाजात वारकरी संप्रादयाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केले . त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सौ सुनिताताई म. आंधळे यांनी श्री संत भगवानबाबा महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदि-पुणे येथे सुरु केलि आहे.

यासंस्थेत शिक्षण घेणाऱ्या उद्याच्या “सावित्रीच्या लेकि ” धर्मक्रांती करतीलच पण सावित्री बाई फुले यांच्या अशीर्वादाने महिला विचारांची धार्मिक चळवळ ऊभी करतील ,म्हणून इतिहासाला या संस्थेची नोंद घ्यावीच लागेल.

सुनीताताई आंधळे या राष्ट्रीय कीर्तनकार असून हजारो कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व राष्ट्रसंत भगवान बाबा व राष्ट्रसंत वामनभाऊ यांच्या सामाजिक कार्याचा त्या प्रसार करत असतात. सोशल मीडियात त्यांच्या कीर्तनाला लाखो लोकांची पसंती असून त्याग व समर्पणातून त्यांनी संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदयाला वाहून घेतले आहे.

Most Popular

To Top