मुख्य बातम्या

संत वामनभाऊंचे सर्वात खोडकर शिष्य ; भक्तिमार्गत चंदनापरी देह झिजवला

संत वामनभाऊंचे सर्वात खोडकर शिष्य ; भक्तिमार्गत चंदनापरी देह झिजवला

महासत्ता : संत वामभाऊ हे बालाघटच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खूप रागात असणाऱ्या वामनभाऊकडे एक पिंपळनेर गावचा खोडकर आणि भाऊ ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करायचे असे शिष्य होते ह.भ.प.अण्णा महाराज जायभाये.

संत वामनभाऊंच्या सोबत राहून अण्णा महाराज यांना भक्ती मार्गाचा लळा लागला. स्वातंत्र्यसेनानी कै. बाबुराव दहिफळे यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. संसारात मन रमत नसल्याने एक पुत्र प्राप्तीनंतर आपल्या पत्नीचा सहमतीने त्यांनी भक्तीमार्ग स्वीकारला.

पिंपळनेर गावातील लालपुरी परिसरातील हनुमान मंदिर परिसरात ते पूर्णवेळ राहून भक्ती करत. उत्कृष्ट पखवाज वादक, कीर्तनकार व प्रवचनकार असा त्यांचा प्रवास राहिला. संपूर्ण आयुष्य त्यांनी वारकरी संप्रदयासाठी त्यांना चंदनापरी झिजवले.

Most Popular

To Top