मुख्य बातम्या

 “महिलांची पंढरी” उभी करणाऱ्या आईसाहेब राधाताई महाराज यांचा संघर्षमय जीवन प्रवास ..

“महिलांची पंढरी” जाणून घ्या तीस वर्ष सतत एका साध्वीचा संघर्षमय प्रवास

ऊसतोड कामगार कन्या तीस वर्षाच्या संघर्षानंतर झाली राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय कीर्तनकार व महाराष्ट्रातील एकमेव महिला प्रभावी मठाधीपती

बेधडक : बीड जिल्यातील शिरूर कासार या नेहमी दुष्काळी पट्यातील ऊसतोड कामगार कुटुंबात राष्ट्रसंत आईसाहेब राधाताई महाराज यांचा जन्म झाला. प्रचंड गरिबी अन त्यात बाल वयातच वडिलांच छ्त्र हरवलं. आईसाहेबांच्या मातोश्री यांनी परिस्थितीशी झुंज दिली अन आपली लेक कीर्तनकार झाली पाहिजे ही भगवान शंकराकडे प्रार्थना केली.

आईसाहेबांच्या मातोश्री यांनी एक दिवस थेट आळंदी गाठली पण मुलगी असल्याने कुठेही आईसाहेबाना शिक्षणासाठी ठेऊन घेईना. या दोघीनी तीन दिवस आळंदीत माउली मंदिरात काढले. त्यांच्या मातोश्रीने मात्र जिद्द सोडली नाही. अन 30 मुल शिकत असलेल्या संस्थेत आईसाहेब एकमेव मुलगी असताना शिक्षण पूर्ण केले विशेष म्हणजे वयाच्या 13 व्या वर्षी पाहिले कीर्तन केले होते. तब्बल पाच वर्षे आईसाहेबानी अध्यात्माचा गाढा अभ्यास केला. अन त्या गावी परतल्या.

समाज प्रबोधनच्या माध्यमातून त्यांनी प्रवचन, व्याख्यान, रामायण, महाभारत याला सुरवात केली. पण गाजली व लोकप्रिय झाली ती त्याची कीर्तन गेल्या तीस वर्षांपूर्वी एखादी महिला प्रभावीपणे वारकरी संप्रदयचा वसा आणि वारसा हि नलवच म्हणावे लागेल. हुंडा बंदी, सती पद्धती, जातीवाद, भ्रष्टचार, दादागिरी, गर्भपात, समाजातील अनिष्ट प्रथावर त्यांनी हल्ला चढवला. कीर्तन हसवण्यासाठी नसून समाजप्रबोधनासाठी आहेत त्यांनी सिद्ध केलं.

त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन भीमसिंह महाराज भगवानगडकर यांनी महान तपस्वी साध्वी संत मीराबाई आईसाहेब यांच्या महाराष्ट्रील पहिल्या महिला परंपरा असलेल्या गादीवर आईसाहेब राधाताई महाराज यांना संधी दिली. थोरल्या आईसाहेब यांनी चार धाम व देशभ्रमती पूर्ण चालत केल्याने आईसाहेब संस्थानास “गरिबांचे चारधाम मंदिर” म्हणून ही संबोधले जाते.

आईसाहेब संस्थान हे पाटोदा तालुक्यातील महासांगवी या गावी आहे. पैलवाणाचे गाव म्हणून ओळखणाऱ्या महासांगाववी गावाचा जिल्हाभर दरारा आहे. त्या गावकऱ्यांना सोबत घेत आईसाहेबांनी 3 ते 4 एकरातील फक्त काही खानाचा छोटा वाडा ओसाड जागेचे परिवर्तन करायचे ठरवले.

प्रचंड अभ्यास, विनम्र स्वभाव, गावाची साथ, गेल्या तीस वर्षात लाखो भक्तांची मांदियाळी उभा करत लोकनेते स्व.मुंडे साहेब यांनी 2010 साली आईसाहेब संस्थान च्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली. अन विकासाला गती मिळाली. लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या भारदार हलीकॅप्टवर एंट्रीने “आईसाहेब” गड राज्यभर राजकीय पटलावर चर्चिला गेला.

गावकऱ्याची साथ बिना कंत्राटदाराचे गुणवत्तेने काम करणाऱ्या आईसाहेबांनी बघता बघता आईसाहेब वाचनालय, आईसाहेब मंगल कार्यालय, आईसाहेब स्पर्धा परीक्षा केंद्र अशा अनेक 10-11 कोटी रुपये कामे पूर्णत्वास नेले. गेल्या दोन वर्षात 5000 लोकक्षमतेचे मंगल कार्यालय व 30-40 खोल्याचे आईसाहेब भक्त निवास 3-4 कोटी रुपयांची इमारत दुर्मिळच.

लॉकडाऊन काळात गावाबाहेर वैदू समाजाची एक बाई थेट आईसाहेबाकडे येऊन बाजरी शिजवून मूल बाळ खात असल्याचे सांगितले. वेदना दाई परिस्तिथी पाहून आईसाहेबानी आपल्या महागड्या सर्व साड्या गरिब महिलांना दिल्या. मंदिर बंद असली तरी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार याच्या विषयी महाराष्ट्र पहिल्यादा थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस बांधवाना, भाजीपाला, फळ, धान्य देऊन मायेची सावली दिली. आईसाहेबांच्या पोलीस स्टेशन भेटीन राज्यभर चर्चा झाली.

राज्यभर नेत्यांसह कार्यकर्ते जीवाच्या भीतीने लपलेली असताना 43 वर्षाची हि साध्वी थांबली नाही. जिल्यातील अनाथ आश्रमाची अडचण कानावर येताच आईसाहेबांनी स्वतः गाडी काढत जिल्यातील अनाथ आश्रमाना धान्य पुरवठा करत मदत केली त्यासह साडी चोळी देऊन खचलेल्या लेकरांच्या मायेचा धीर वाढवला .

झी 24 तास च्या सलग 24 तास कीर्तन सेवेत त्यांनी त्यांनी वर्ल्ड रेकॉड केले आहे. आजतागायत त्यांनी 5000 हुन अधिक कीर्तन व प्रवचन सेवा केल्या आहेत. याच बरोबर आजतागायत गावकुसाबाहेरच्या वैदू समाजाला गावान जायबंदी केली असताना आईसाहेबांनी पत्रकार, दानशूर याच्या सहकाऱ्यांने 59 कुटुंब दत्तक घेतले. या त्याच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना “अखिल भारतीय वारकरी महासंघ” या वारकरी पहिल्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संधी मिळाली .

छत्रपती संभाजी राजे हे काही दिवसांपूर्वी महासांगावी येथे आले होते. आईसाहेबांचे उभा केलेले धार्मिक व सामाजिक कार्य पाहून ते अक्षरशः भारावून गेले. त्याचे कीर्तन ऐकण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्याग अन समर्पणाच्या भावनेतून त्याचे कार्य अविरत चालू आहे.

आज आईसाहेबांचा 43 व वाढदिवस धार्मिक कार्य गेली 30 वर्ष राज्यभर मोठ्या प्रमानात तर देशभर गुजरात, दिल्ली, कर्नाटक, मद्यप्रदेश, राजस्थान या ठिकाणी त्याची कीर्तन सेवा झाली व त्यांना मानणारा वर्ग आहे. गेल्या 30 वर्षात आईसाहेबांचा प्रचंड मोठा भक्त वर्ग लाखोंने महाराष्ट्र व देशभर आहे.

एक दिवस समाजासाठी यांनी कोयता मुक्ती अभियान राबवत 50 महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण शिबीर आयोजन केले आहे त्यासाठी त्यांनी तात्काळ आईसाहेब मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. आज त्यातील 15 महिना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे.

परवा परवा एक महिला गरोदर व प्रचंड आजारी असून आर्थीक अडचणीमुळे हॉस्पिटला जात नसल्याचे कळताच. आईसाहेबांनी सोबत जात तिची तपासणी केली. भयानक वास्तव समोर आले अन त्या ताईच्या पोटात बाळ मृत्यू झाले होते. त्या ताईंना दवाखान्यातून घरी पोहचताच आईसाहेबांनी मठाधिपती असल्याचा मान बाजूला ठेवत किराणा साहित्य क आवश्यक वस्तू तिच्या घरी पोहच केल्या.

थोरल्या आईसाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन निघालेल्या आईसाहेब महिला वारसा महाराष्ट्रातील एकमेव महिला मठाधिपती आहेत. त्यांच्या गुरु संत मीराबाई यांनी पायी चारी धाम व संपूर्ण देशभरातील देवदर्शन पायी केले आहे. म्हणून गरीब, अडचणींत असलेल्या ज्या महिला चारधाम किंवा पंढरपूरची वारी करू शकत नाहीत. ती सर्व लोक “आईसाहेब गडावर” जमतात म्हणून “महिलाची पंढरी” म्हणून या आईआहेब संस्थानला आईसाहेबांनी ओळख करून दिली.

अखिल हिंदुस्थाचे दैवत पंढरीच्या पांडुरंगा सह राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामानभाऊ , बजरंगबली हनुमान या मंदिरासह आवपल्या गुरु संत मीराबाई याचे सुवर्णमंदिर त्यांनी उभे केले आहे.

त्याग, तपस्या, सामाजिक भान , आईसाहेब मला वेळेवर हॉस्पिटला पोहचवले नसत तर माझा जीव गेला असता , आईसाहेब आयुखभर विसरणार नाहीत म्हणणारे वैदू कुटूंब , आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांना आईसाहेब मंगल कार्यलय मोफत करून इथल्या शेतकरी व जवना प्रति असणारा आदर करणारी साध्वी गेली तीस वर्षे धार्मिक व गेली एक वर्ष सामाजिक कार्यात अखंड स्वतःला तेजत ठेवतेय.

Most Popular

To Top