मुख्य बातम्या

जीवाची पर्वा न करता आ.लंके याच्या कोविड सेंटर मध्ये कीर्तन करणाऱ्या साध्वी आहेत “संस्कृत पंडित”…

जीवाची पर्वा न करता आ.लंके याच्या कोविड सेंटर मध्ये कीर्तन करणाऱ्या साध्वी आहेत “संस्कृत पंडित”…

मुंबई: भाळवणी येथे आ.निलेश लंके यांच्या कोविड सेंटर मध्ये जीवाची पर्वा न करता प्रकाश झोतात आलेल्या संस्कृत पंडित कोण ? सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी अध्यात्माच्या आवडीने थेट आळंदी, मुंबई, वाराणशी, दिल्ली असा एकटी प्रवास करते अन “संस्कृत पंडित” म्हणून ओळखली जाऊ लागते.

आपण जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील संघर्षकन्या सविताताई शास्त्री याच्या विषयी. आशाबाई सदाशिव खेडकर यांच्या त्या कन्या असून अध्यत्माच्या आवडीने त्यांनी थेट आळंदी गाठली. डॉ.नारायण जाधव यांच्याकडे त्यांनी संस्कृत च्या अध्ययनाला सुरवात केली.

एम.ए संस्कृत करण्यासाठी महाराष्ट्रात त्यांना कुठंच ऍडमिशन मिळत नाही हे पाहून थेट वाराणशी येथे एम.ए. पूर्ण केले. काही दिवस त्यांनी दिल्ली येथे संस्कृत अध्ययन पूर्ण केले. या काळात बगलोर, विलेपार्ले या ठिकाणी त्यांनी खडतर मार्गातून शिक्षण घेतले.

संन्याशी आयुष्य जगणाऱ्या सविताताई यांना शास्त्री व “संस्कृत पंडित” ओळखल जात. या वर त्या थांबल्या नाही त्यांनी बी.एड करून आष्टी येथे प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. गेली एक तप त्या संन्याशी मार्गाने अध्यात्मिक विचार राष्ट्रसंत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या आशीर्वादाने कीर्तन व प्रवचनातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

Most Popular

To Top