मुख्य बातम्या

राज्यभर भन्नाट भिंगरी म्हणून प्रसिद्ध ; ग्लॅमरच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री आशू सुरपूरकरची गरूड भरारी

ग्लॅमरच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री आशू सुरपूरकरची गरूड भरारी.

मुंबई : या जगात बोटावर मोजण्याईतके असे खूप क्वचित जण आहेत ज्यांना खरोखरच मनापासून वाटत की आपण काहीतरी वेगळं करायला हवं. अन् मग सुरू होतो स्वतः च्या ध्येयप्राप्ती साठी दिवस राञ रक्ताच पाणी करायला लावणारा स्वयम् संघर्षाचा न संपणारा अग्नीप्रवास. पण काहीजण असतात आयुष्याच्या या अग्नीपरीक्षेस आव्हान देऊन जिद्द चिकाटी अन् भक्कम आत्मविश्वासाच्या बळावर निर्भिडपणे धैर्याने असंख्य संकटांना सामोरे जाऊन स्वतः ला सिध्द करणारे. असंच एक उदाहरण म्हणजे अल्पावधीतच कुठलाही गॉडफादर इंडस्ट्रीमध्ये नसतांना आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मुंबईची मराठमोळी अभिनेत्री आशू सुरपूर. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गोविंदाजी यांच्या प्रेरणेने स्वतः ला आशू सुरपुरकरने अभिनय क्षेञात एवढे झोकून दिले.

काहीही झाले तरी मी अभिनेत्री होणारच असा ठाम निर्णय घेतला. अन् मग सुरू झाला स्वप्न सत्यात उतरवण्याचा एक जिद्दी असा ध्येय वेडा अभिनय प्रवास. दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील बे दुणे चार, सुरक्षा तसेच स्टार प्रवाहची लक्ष्य झी मराठीवरची तुझ्यात जीव रंगला अन् काहे दिया परदेस अशाप्रकारच्या आत्ता पर्यंत एकूण १७-१८ वेगवेगळ्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आशूने काम केलेले असून एवढ्यावर न थांबता तिने सई ताम्हणकर सोबत तु ही रे दिलिप प्रभावळकर यांच्या सोबत झाला बोभाटा, तसेच संतोष जुवेकर सोबत पोलिस लाईन, कॉमेडीचा बादशहा सिद्धार्थ जाधव सोबत दुनिया गेली तेल लावत, सयाजी शिंदे सोबत मोहर अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर जवळपास ३० ते ३५ चिञपटांमध्ये खूप मोठी कौतुकास्पद अन् अभिमानास्पद मोलाची कामगिरी केलेली आहे.

मी लेखक राहुल महाजन मला आपणास सांगण्यास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे की माझी मैञीण आशू सुरपूरकरचा प्रधानमंत्री हा नवा सिनेमा लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तरी आपण न विसरता हा सिनेमा चिञपट गृहात बघायला जावा अन् मला पुरेपूर खात्री आहे आपल्याला सिनेमा नक्कीच आवडेल.लवकरच अशी ही भन्नाट भिंगरीचिञपटा मधुन आशु सुरपुर दिसणार आहे आणि तीच्या महेनतीला दादत देऊया.

Most Popular

To Top