मुख्य बातम्या

साताऱ्याच्या युवकाने बनवले अनोखे ऊस भरणी व वाहतूकीचे यंत्र…! आ. सुरेश धस आण्णांनी घेतली भेट.

साताऱ्याच्या युवकाने बनवले अनोखे ऊस भरणी व वाहतूकीचे यंत्र…!

आ. सुरेश धस आण्णांनी घेतली भेट.

सातारा जिल्ह्यातील रामकृष्णनगर येथे राहणार युवक अभियंता सनी दिलीप पाटील (Mechanical Engineer) या युवकाने ऊसतोड कामगारांच्या जीवनात व कामात नवी क्रांती घडवून आणली आहे,ऊसतोडणी कामगारांना फडात ऊस वाहतूक व ऊस भरणी करण्यासाठी मशीन बनवल्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांना काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती.

आज सनी काळभोर यांच्या गावी जाऊन त्या माशीन विषयी माहिती डेमोच्या माध्यमातून समजून घेतली, ही मशीन राज्यातील १४ लाखांवर असलेल्या ऊसतोडणी कामगारांना दिलासा देणारी आहे,त्यामुळे येणाऱ्या काळात ट्रक व ट्रॅक्टरने ऊस वाहतूक व तोडणी मजुरांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल,डोक्यावर मोळी घेऊन चालायचे श्रम व वेळ यामुळे वाचणार आहे,त्यामुळे मोठ्या वाहतूकदार व मुकादमांनी ग्रुप मध्ये ही मशीन खरेदी करून मजुरांच्या अति कष्टाला पूर्णविराम देऊ शकतो असे आमदार सुरेश अण्णा यांनी सांगितले.
काळभोर कुटुंबातील सनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा अण्णाच्या वतीने सन्मान करण्यात आला, यावेळी लोकनेते गोपीनाथजी साखर कामगार संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सुखदेव अप्पा सानप, मुकादम भरत लवांडे,भुईंज कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर व मुकादम सयाजी अप्पा निकम ,अनिल महारनवर, स्थानिक गावचे सरपंच उपसरपंच व गावकरी उपस्थित होते.

Most Popular

To Top