मुख्य बातम्या

सिनेअभिनेत्रीचं वृक्षप्रेम पाहून तुम्ही भारावून जाल ..

सिनेअभिनेत्रीचं वृक्षप्रेम पाहून तुम्ही भारावून जाल …

पुणे : सिनेसृष्टी शब्द ऐकताच आपल्या समोर उभी राहते ती प्रतिमा म्हणजे, झगमगाटाची लाइफस्टाईल, मॉडेलिंग, एक्टिंग आणि बरंच काही या सर्वांना अपवाद म्हणजे तब्बल बावीस सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी सिनेअभिनेत्री आर्या घारे. आर्याने आत्तापर्यंत देऊळ बंद, 66 सदाशिव, पोस्टर गर्ल, बंदी शाळा अशा अनेक मराठी – हिंदी सिनेमा, वेब सिरीज मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आर्या एक जगावेगळा छंद जोपासत आहे. आर्याला लहानपणापासून झाडांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आर्याने गेल्या चार-पाच वर्षांमध्ये वीस हजारांपेक्षा जास्त झाडं लावून त्यांचे संगोपन केले आहे. आर्याला भारतीय झाडांविषयी विशेष आकर्षण आहे. भारतीय झाडं त्यांचे औषधी गुणधर्म, झाडांचे वातावरणातील महत्व या सर्वां विषयी आर्या तासन् तास गप्पा मारते. विशेष म्हणजे आर्य आता 14 वर्षाची असून इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे.
आर्याच्या वृक्ष मोहिमेविषयी –

आर्या गेली अनेक वर्षांपासून तिच्या लहान मैत्रिणी आणि आजूबाजूचा परिसर साफ करणारे सफाई कर्मचारी, यांच्या मदतीने झाडांच्या वेगवेगळ्या बिया जमा करते. त्या बियांची झाड बनवणं हे आर्य आणि तिच्या मैत्रिणींचं वर्षभरातील महत्त्वाचं काम.

यावर्षी आर्यने तिच्या या मोहिमेमध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी सोशल मीडियावरून विनंती केली, की तुम्ही मला बिया पाठवा मी तुम्हाला बियांची रोपे तयार करून पाठवते. तिच्या या विनंतीला महाराष्ट्रातील हजारो वृक्षप्रमिंनी प्रतिसाद दिला, लाखो बिया पोस्ट आणि कुरियर च्या माध्यमातून आर्याला पाठवत आहेत. या संपूर्ण बियांची रोपे बनवण्यासाठी आर्याने तिच्या जातेगाव. तालुका .पारनेर जिल्हा. अहमदनगर. या गावी शेतामध्ये मोठी नर्सरी बनवले आहे. आर्या यावर्षी नर्सरीच्या माध्यमातून लाखो झाडं तयार करून महाराष्ट्रातील विविध डोंगरांवर आणि अनेक गावांमध्ये लागणार आहे.

आर्याची देवराई विषयीची संकल्पना –

देवराई बद्दल बोलताना आर्या सांगते, की देवराई च्या माध्यमातून आपण अनेक औषधी झाडांचे संगोपन प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये, प्रत्येक शाळांमध्ये करू शकतो. ज्या – ज्या ठिकाणी देवराईचे संगोपन करण्यासाठी जागा उपलब्ध होईल अशा प्रत्येक ठिकाणी आर्या महाराष्ट्रात हजारो देवराई उभा करण्याच्या प्रयत्नात आहे.

Most Popular

To Top