महाराष्ट्र

मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब वाढदिवसानिमित्त पुणे येथे गरजूंना अन्नदान..

आज दि.15 जुलै रोजी मा. ना. श्री. धनंजयजी मुंडे साहेब (सामाजिक न्याय मंत्री) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन अन्नदान करण्याचा संकल्प केला कारण साहेब नेहमी सांगतात की माझ्या वाढदिवसाला माझ्यावर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवा गोरगरीब गरजवंतांना त्यांची जी गरज असेल ती त्यांना दान करून मदत करा तीच खरी तुमची अनमोल भेट माझ्यासाठी असेल

त्यानुसार आज पुणे शहरातील ससून रुग्णालय परिसर, मालधक्का लाईन व पुणे स्टेशन परिसरातील गोरगरीब, निराधार, अनाथ,तसेच दिव्यांग ज्यांचे की वास्तव्यच रस्त्याच्या कडेला आहे अशा जवळपास 250 लोकांना जेवणाच्या प्लेट्स वाटण्यात आल्या..त्यांना आम्ही या प्लेट्स कशाकरिता वाटत आहोत याची कल्पना नाही परंतु त्यांना लागलेली भुक पाहुन बरंच काही सांगुन जात होती मला माझे मन सांगत होते की अशा लोकांना दोन घासाची किती गरज आहे सर्वांना हाथ जोडले आणि मनात म्हंटले की माझ्या साहेबांना तुमचे दीर्घायुषी व निरोगी राहण्याकरिता आशीर्वाद राहु द्या..! हा उपक्रम राबविण्याकरिता एकयान फौंडेशन चे श्री. भारत जगताप, बर्नाड डिसुझा यांची अनमोल मदत झाली तसेच श्री. ज्ञानेश्वर बडे, रविराज दहिफळे, विनोद मुंडे,निखिल वाघुले इत्यादींचे पण सहकार्य लाभले..

Most Popular

To Top