मुख्य बातम्या

थोर आदिवासी समाजसेवकाची भेट……व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण

  • थोर आदिवासी समाजसेवकाची भेट……व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण

प्रतिनीधी : मी पुणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून काम करतअसताना माझी ओळख एक थोर आदिवासी पारधी समाजसेवक नामदेव भोसले यांच्यासी झाली. त्यावेळेस त्याचे विचार ऐकून मी थक्क झालो होतो, एक पुस्तक विकनारा मुलगा आपल्या समाजाला लागलेला चोर दरोडेखोर नावाचा कलंक पुसून काढण्यासाठी काम करण्याचे स्वप्न ऊराशी बाळतो त्याचे हे सुंदर विचार ऐकुन मी स्वाता त्याच्या घरी गेलो,
त्यावेळेस त्याची एक पत्र्याची झोपडी होती त्या झोपत बसलो तेथे नामदेवच्या आई वडीलांना भेटलो त्यांचे निस्वार्थी विचार पाहुन मनाला आनंद झाला, नतंर पुढे मी नामदेवच्या कामचे कौतुक करत त्याला मदत करत गेलो,नतंर माझी बदली होत गेली मी महाराष्ट्राचा अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असेपर्यंत चार वेळा नामदेवच्या घरी जाण्याचा योग आला,त्याचे काम पाहुन देशातील पुढारीना लाजवेल इतके चांगले कार्य नामदेव भोसले हे करत आहेत, माणसाला माणुसकी जोडण्याचे काम उराशी बाळगून त्यांनी देशाची निस्वार्थ शेवा करत आहे,असे मत माजी अप्पर पोलीस महासंचालक मा.व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यानी व्यक्त केले.

पुढे म्हणाले की या देशात प्रत्येक जन पैशाच्या मागे धावत आहे,प्रत्येक जण पगारावर काम करत आहे,परंतू पारधी समाज म्हणले की त्यांच्याकडे कलंकित नजरेन चोर दरोडेखोर गुन्हेगार म्हणून पहायले जाते, अशा या समाजावरील सिक्का पुसण्यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. यातच पुणे जिल्ह्यातील ऊरुळी कांचन येथील पारधी समाजातील नामदेव ज्ञानदेव भोसले यांने स्वताला वाहुन घेतलय, लहानपणापासून नामदेव हा गरिबीत होरपळून गेला होता, परंतू लहान पणी नदीकाठावर एका जंग्लात पाल ठोकून रहात होता,आपल्या गरीबीपायी गावामध्ये, शिंग्लनवर, रस्त्यावर भिक्षा मागून खाणारा मुलगा पुढे आपल्या गरीबी मुळे नव्वीपर्यंत 14 शाळा बदलतो,46गावे भिक्षा मागून खात लहानाचा मोठा होतो,तोच मुलगा एक पुस्तक विक्रेता बनतो, तो स्वताला सावरत दुसर्‍याच दुःख कमी होण्यासाठी कांम करतो हे आनंदीदाई आहे, असे माजी पोलीस महासंचालक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण हे हैद्राबाद येथे बोलत होते,
( ते म्हणाले नामदेवने अनुभवलेल्या व्यवस्तीचे चित्रण व पारधी समाजाची भाषा अनिष्ट ऋषी परंपरा हे “मराशी,व “ये हाल, या पुस्तक रुपी लोकांच्या समोर आणल्या , तो स्वता पैसे विना जगण्याचे स्वप्न उराशी बाळगून माणसाला माणूस जोडीत आज तो संपूर्ण राज्यतील देशातील 13 कोटी आदिवाशी लोकांना एकत्रीत आणण्याचे कांम केले आहे अशा थोर आदिवास समाजसेवकाला आपण सर्वजण मिळून साथ देऊया,) अशा नामदेवाचे कौतुकास्पद कांम पाहुन आनंद वाटतो,नामदेव भोसले यांनी गेली 20 / 22 वर्ष भोसले हे समाजाची सेवा फार मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यांनी पारधी सणाजाला लागलेला चोर, दरोडेखोर,नावाचा कंलक नाहीसा करुन राज्यात पोलीस आणी पारधी यांच्यातील कलंकित दरी कमी करुन त्यांच्यात एक मैत्रिचे नाते तयार केले, पोलीसानी ज्यांना चोर समजुन आत टाकले होते अशाच्याळीस हजार लोकांना चोर दरोडेखोर नावाच्या कलंकित चिखलातून बाहेर काढून त्यांना मोठ्या संन्मानाने गावात स्थाईक केले,हे त्यांचे काम सर्वाना आदर्शवाद ठरणार आहे,समाजातील अनिष्ट ऋढीपरंपरा बंद करून त्याने स्वता एक मुलगी झाली म्हणून नव-याने सोडून दिलेल्या महिलेसी लग्न करुन त्याने तीच्या लहान मुलीचा स्विकार केला त्यांच्या या कामांचे कौतुक सा-या देशात झाले .

पुढे त्यांनी महाराष्ट्रातील पारधी व आदिवासी बांधवाच्या मुलांना शाळेत टाकून त्यांना लागणारे शालेय वस्तू व जातीचे दाखले,जन्म प्रमाणपत्र, रेशनिंग कार्ड वेवसायचे कार्ड असे लागणारे कादपत्रे स्वखर्चाने घर पोच करुन हजारो अदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, अंतापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जाऊन कांम करताना हजारो तंटे गावपातळीवर मिटवले,जाईल त्या गावी वृक्षारोपण करणे या संकल्पनेतून हजारो झाडाचे वृक्षारोपण केले,त्यांनी आज पर्यंत पाचशे ते सहाशे गरीब कुटुंबातील मुला. मुलींचे लग्न लावून दिले.

2020 /2021मध्ये कोरोणासारखी महाभयंकर महाबिमारी आली अशा कोरोणाच्या संकटात भोसले यांनी स्वताची परवा न करता देश शेवेसाठी हातभार लावला एक हात मदतीचा या विचाराने नामदेव भोसलेनी 10हजार 700से बाजाराचे किट मित्र परिवाराकडून भिक्षा मागून जिल्हातील ग्रामीण भागात गावोगावी जाऊन गरीब शोषित पिढीत भुखलेच्या लोकांच्या घरी जाऊन वाटले,त्यामध्ये लाखो गरीब लोकांची भुख भागवली हे कौतुकास्पद काम आहे ,त्यांच्या या सर्व कामाचा मी साक्षीदार आहे.

नामदेव भोसले यांनी समाजसेवा, साहित्य,व शांतीदुत म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत, आपण पारधी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय काम करत आहे,त्याचा पोलीस दलास व शाशनाला वेळोवेळी महाराष्ट्र राजयाला फायदा होत आहे,आपण भावी काळात ही अशाच प्रकारे कामकाज करुन उच्चश्रेणीची गुणवत्ता प्राप्त कराल असा आम्हाला विश्वास आहे,आदिवासी समाज सुधारक , साहित्यिक नामदेव भोसले यांना महाराष्ट्रराज्य. हैद्राबाद तेलंगणा व अंद्राप्रदेश यांच्या वतीन पुढील कार्यास शुभेच्छा देतो.

या वेळी हैद्राबाद येथे माजी अप्पर पोलीस महासंचालक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण बोलत होते त्यावेळेस
जेष्ट आदिवासी संशोधक व लेखक भास्कर भोसले,
राष्ट्रीय आदिवासी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपी काळे,
,आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले,बलवर पवार, कुणाल भोसले,सचिन भोसले,स्वप्रित भास्कर भोसले.रोहित भोसले,व हैद्राबाद येथील आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता मोठ्या संख्येतऊपस्थितीत होते.

Most Popular

To Top