चालू इनोव्हा क्रिस्टा गाडीची डिक्की ड्रायव्हरच्या मर्जीशिवाय उघडूच शकत नाही! डिक्की उघडताना व्हीडिओ मध्ये दिसणाऱ्या महिलेने गाडीत काही ठेवले का? ती त्यांच्या सोबतचीच होती?
परळी (प्रतिनिधी) : – परळीत काल करुणा शर्मा यांच्याबाबत घडलेल्या घडामोडींमध्ये अनेक वृत्त वाहिन्यांनी एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत, एका महिलेने गाडीत पिस्तुल ठेवले असा संशय व्यक्त केला आहे. परंतु जाणकारांच्या मते नवीन इनोव्हा क्रिस्टा गाडी रनिंग मध्ये अगदी कितीही स्लो असली तरीही, ड्रायव्हर ने आतून अनलॉक केल्याशिवाय गाडीची डिक्की बाहेरून उघडताच येत नाही. काही जाणकारांनी तर प्रात्यक्षिक करून पाहावे असेही म्हटले आहे.
याशिवाय त्या महिलेने ड्रायव्हर च्या मर्जीने करुणा शर्मा यांच्या कडील काही सामान घ्यायला किंवा ठेवायला डिक्की उघडली नसावी का? ती महिला करुणा शर्मा यांच्या ताफ्यातीलच नसावी का? असा तर्कही लावणे नैसर्गिक आहे.
समोर पोलीस, एवढे लोक, अनेक प्रसार माध्यमांचे कॅमेरे असताना, विशेष म्हणजे गाडीच्या आत शेवटच्या सीट पर्यंत लोक बसलेले असताना कोणी वेडा माणूस तरी गाडीत पिस्तुल ठेवण्याचा प्रयत्न करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होणे देखील नैसर्गिक आहे!
या प्रकरणावर पोलीस खात्याने अजूनतरी अधिकृत भूमिका जाहीर केली नाही, तूर्तास या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे समजते आहे.
करुणा शर्मा यांची आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी वैद्यनाथ मंदिरातून निघताच आपल्याला ‘रायता फैलवायचा’ (गोंधळ घालायचा) आहे असे बोलताना स्पष्ट ऐकायला येत आहे. सोबतच हे करण्यामागचा त्यांचा हेतू ‘प्रेशर बनाके पैसे निकालने है’ (दबाव टाकून पैसे उकळायचे आहेत) हे ही त्या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्ट ऐकायला मिळत आहे.
या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून हे तथाकथित पिस्तुल कांड म्हणजे करुणा शर्मा यांनी स्वतःच जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न नसावा हे कशावरून? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासांती मिळतीलच परंतु तर्काच्या आधारे संशय व्यक्त केला जात असला तरी चालत्या इनोव्हा क्रिस्टा गाडीत बसलेल्या ड्रायव्हरच्या मर्जीशिवाय बाहेरून डिक्की उघडता येत नाही हे मात्र निश्चित आहे.