रुपालीताई चाकणकरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवार दि.१४ सप्टेंबर २०२१ रोजी मौजे.निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे.
तरी आपण सर्वांनी सदर कार्यक्रम प्रसंगी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
विविध विकासकामे!
१)मौजे.निघोज येथे.Mpsc/Upsc अभ्यासिका इमारत बांधकाम करणे-१००.०० लक्ष.
२)मौजे.निघोज येथे स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे-१०.०० लक्ष
३)मौजे.निघोज येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.राणिताई लंके यांच्या निधीतून गावा अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे-११.०० लक्ष.
४)मौजे.निघोज येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.राणिताई लंके यांच्या निधीतून गावा अंतर्गत १८ हायमॅक्स बसवणे-१०.०० लक्ष.
५)मौजे.चोंभूत येथे चोंभूत ते जिल्हा हद्द रस्ता करणे.१००.०० लक्ष