मुख्य बातम्या

धनगर समाजाचा सर्वात लोकप्रिय स्वयंभू नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ….

धनगर समाजाचा सर्वात लोकप्रिय नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

भूम : आज भूम येथे पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी सूर्यकांत कांबळे हितचिंतक,संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची ‘विचारमंथन’ बैठक पार पडली.

जय हनुमान संघटना व मल्हार आर्मी अशा बलाढ्य संघटना व त्याच्या शेकडोत शाखा असणारा स्वयंभू व महादेव जानकर यांच्या नंतर सर्वात लोकप्रिय समजले जाणारे नेते म्हणजे सूर्यकांत कांबळे.

यावेळी सूर्यकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे

आपला गेल्या एक दशकाहुनचा अधिकचा राजकीय व सामाजिक प्रवास हा सत्तेच्या विरोधात राहिलेला आहे,याकाळात निस्वार्थी पणे सदैव माझ्या पाठीशी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आज न्याय देणं गरजेचं आहे व तो न्याय सत्तेच्या माध्यमातून देऊ शकतो.सत्ता हे समाज,कार्यकर्ता यांच्या उत्कर्षाचे मूळ आहे.समाजाचे,कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता असणं महत्वाचे आहे,तरच आपण प्रश्न सोडवू शकतो.

हितचिंतक,पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या एकविचाराने लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.माझ्या याआधीच्या काळातही आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता व येणाऱ्या काळातही असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो !

  • सुर्यकांत (सुरेश भाऊ) कांबळे

Most Popular

To Top