ना. भुजबळ साहेब यांनी ओबीसीच नेतृत्व करताना धनगर आरक्षण व वंजारी ऊसतोड कामगार यावर आपली भूमिका स्पष्ट करावी-संतोष बिचुकले
प्रतिनिधी पुणे- धनगर आरक्षण व मेंढपाळ बांधवांसाठी काम करणारे तसेच ओबीसी आरक्षण साठी हायकोर्टात केस दाखल करणारे धनगर आरक्षण उपोषणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी सध्याचे मंत्री महोदय आणि ओबीसींचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ साहेब यांनी धनगर आरक्षणा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच ऊसतोड कामगारांच्या आणि मेंढपाळ बांधवांवर सत्तर वर्ष अन्याय होत आलेला आहे त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मेंढपाळ बांधव व ऊसतोड कामगार हा पण ओबीसीतील एक घटक आहे. परंतु हा घटक नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. शिक्षणापासून वंचित आहे आरक्षणापासून वंचित आहे आणि त्यांच्या जीवनातील रोजचा संघर्ष हा सुरूच आहे मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांच्या जीवन परिस्थिती हालाखीच्या परिस्थितीचे फोटो दाखवून आरक्षण मागितले जात आहे. परंतु मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांच्या मूलभूत गरजांकडे ही देशातील कोणत्याही ओबीसी नेतृत्व लक्ष देत नाही.
छगन भुजबळ साहेबांनी धनगर आरक्षणा संदर्भात आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी. फळांवर ती रोज हल्ले होत आहेत सर्व उपकरणांचा प्रश्न निर्माण झालेला आहे यावरी भुजबळ साहेबांनी आपलं मत व्यक्त करावं. तसेच ऊसतोड कामगार ही दरवर्षी आपलं घरदार सोडून साखर सम्राटांच्या कारखान्यावर ती ऊस तोडी ला जात असताना त्याला काय सुविधा सोयी सुविधा मिळतील त्यांच्या शिक्षणाचा सामाजिक परिस्थितीचा बदल कसा घडेल यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे आपले मत व्यक्त केले आहे.