मुख्य बातम्या

सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

परळी : गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

या पुढेही महाराष्ट्रभर लौकिक होईल अशा स्पर्धा आयोजित करू – सौ राजश्रीताई धनंजय मुंडे

परळी (दि. 15) – : परळी येथे आयोजित गौरी- गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना आज सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. परळी येथे आयोजित करण्यात आलेली गौरी-गणपती सजावट स्पर्धा भविष्यात राज्यभरात नाव लौकिक प्रस्थापित होईल, अशा स्वरूपात आयोजित करू असे यावेळी बोलताना सौ. राजश्रीताई मुंडे म्हणाल्या.

या स्पर्धेचे प्रथम बक्षीस सौ. अनुराधा अनिल अदोडे (रु. 5111), द्वितीय बक्षीस सौ. श्रद्धा धनंजय स्वामी (रु. 3111), तृतीय बक्षीस सौ. गायत्री ओमप्रकाश झंवर (रु. 2111), तसेच सौ. शोभा फुटके यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रणव परळीकर, ज्ञानेश्वर होळंबे, जयदत्त नरवटे, बळीराम नागरगोजे, कृष्णा व्यवहारे आदींनी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सौ. राजश्रीताई मुंडे यांनी अभिनंदन केले.

बक्षीस वितरण कार्यक्रमास सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्यासह, सौ. मनीषाताई अजय मुंडे, सौ. अर्चनाताई रोडे, सौ. अन्नपूर्णाताई जाधव, पल्लवीताई भोयटे, अनंत इंगळे, शंकर कापसे, रवी मुळे, सचिन स्वामी आदी उपस्थित होते. परळीतील प्रसिद्ध आर्टिस्ट लखन भद्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Most Popular

To Top