संघर्षकन्या पूजा मोरेचा लढा यशस्वी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे यश;खरीप 2020 चा पीकविमा शेतकऱ्यांना मिळणार..
बीड : NDRF निकषानुसार कृषी व महसूल चे पंचनामे ग्राह्य धरून खरीप 2020 चा पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्यासंदर्भात कृषी आयुक्त,पुणे यांच्या हालचाली चालू.
खरीप 2020 मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर सरकारमधील मंत्री व बड्या नेत्यांनी पाहणी दौरे केले. एवढंच नाही तर केंद्र सरकारकडून NDRF च्या पथकाने देखील मराठवाडा, विदर्भात येऊन पंचनामे केले.परंतु शेतकऱ्यांना पीकविमा भेटला नव्हता.
त्यामुळे NDRF च्या निकषानुसार कृषी व महसूल प्रशासनाने केलेलं पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र प्रदेशाध्यक्ष (यु. आ) पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष श्री.गजानन बंगाळे व विदर्भ अध्यक्ष श्री.प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केली.
बीड,जालना, बुलढाणा येथे तालुका पातळीपासून या आंदोलनाला सुरुवात करून थेट विधानभवन व कृषी आयुक्तालय,पुणे येथे देखील आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कृषी आयुक्त यांच्या दालनात झालेल्या बैठकीत NDRF च्या निकषानुसार कृषी व महसूलचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी राज्यसरकारने विमा कंपनी कडे पाठपुरावा करावा ही मागणी लावून धरण्यात आली होती.आंदोलनाची दखल घेऊन मा.कृषी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांना व मा.राजू शेट्टी साहेब यांना फोन करून बैठक लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा.कृषिमंत्री यांची भेट घेऊन आग्रहपूर्वक मागणी रेटत सरकार स्थरावरच्या हालचाल जाणून घेत शेतकऱ्यांना NDRF नुसार मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती.
त्यावेळी फोन द्वारे मा.राजू शेट्टी यांनी देखील मंत्र्यांशी चर्चा करून पीकविमा न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे कळवले होते.
त्यानुसार कृषी आयुक्तालयाने दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सर्वच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या यादया तातडीने मागवण्या संदर्भात शासन निर्णय काढला आहे. जवळ जवळ महिन्याभरानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळेल असे कृषी आयुक्त यांच्या सोबत झालेल्या संपर्कातून कळाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पडेपर्यंत मी संघटनेमार्फत या विषयाचा पाठपुरावा करत आहे.