परळी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धरणाकाठच्या वाणटाकळी, नागापूर आदी परिसराची आज जिल्हा परिषद गटनेते अजय भाऊ मुंडे यांनी सहकाऱ्यांसमवेत पाहणी केली. नुकसानीने हैराण झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या पिकांची पावसाने केलेली अवस्था पाहून मन व्यथित झाले.
अतिवृष्टीने परिसराचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब राज्य सरकार व विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी ना. धनंजयजी मुंडे साहेब प्रयत्नशील आहेत, असे आवाहन शेतकऱ्यांशी संवाद साधत केले.