मनसेला मिळाला ‘पायाला भिंगरी’ लावलेला नेता’ ! लोकात मिसळणारे नेतृत्व बापू आहेत तरी कोण ?
सोलापूर : मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या पक्ष निष्ठेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘नेते’ पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर ह्या भल्या मनाच्या माणसाने जणू मागे वळूनच पाहिले नाही. राजसाहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर म्हणतात ना की, पायाला भिंगरी लावावी तसा अवघा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला ज्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील हजारो महाराष्ट्र सैनिकांना जणू नवीन उर्जाच मिळाली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. दिलीप धोत्रे ह्यांनी मागिल काही दिवसांपासून स्वतःला पक्ष कार्यात एवढे झोकून दिले आहे की ते दिवसातील १६-१६,१८-१८ तास पक्ष वाढीसाठी जोमाने प्रयत्न करत आहेत.
श्री. दिलीप बापू धोत्रे ह्यांना लोक आदराने ‘बापू’ ह्या नावाने हाक मारतात. काल कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शाखांचे उद्घाटन करून आज लगेच जिल्ह्यातील ‘डिव्हिपी ग्रुप च्या गट क्रमांक ०४ समुहाचा सांगोला सहकारी कारखान्यात त्यांनी उपस्थिती दर्शविली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या पक्षातील ह्या जबरदस्त सक्रियतेमुळे आगामी काळात मनसेला मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळेल असे मत राजकीय जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.