मुख्य बातम्या

उल्हासनगरमध्ये भाजपाला खिंडार 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

उल्हासनगरमध्ये भाजपाला खिंडार 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

ठाणे :- राष्ट्रवादीचे आमदार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय स्फोट घडवून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. तब्बल 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हे सर्व नगरसेवक पप्पू कलानी गटाचे आहेत. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा हॉलमध्ये सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर उल्हासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी यांची निवड करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच आणखी ११ नगरसेवक देखील येत्या काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा देखील त्यांनी केला आहे. याशिवाय कांबाच्या संरपच यांच्यासह वरप आणि म्हारळच्या उपसरपंच व सदस्यांनीसुध्दा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. तर आरपीआय व पीआरपीच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने प्रवेश केला.

संपूर्ण महाराष्ट्र तसेच उल्हासनगर मध्ये देखील गेल्या वर्षभरामध्ये भाजपामध्ये आयारामाची संख्या वाढली होती परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र, आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु ंग लावला आहे. टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे २१ नगरसेवक, १९ माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे ११४ जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणा:या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दिपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्र वर्ती – सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, छाया चक्र वर्ती – सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती – प्रभाग समिती १ तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समतिी ३ तथा नगरसेविका, दिनेश लिहरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी नगरसेविका, आशा भिराडे – नगरसेविका, सविता तोरणो-रगडे – नगरसेविका, रविंद्र बागुल नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील नगरसेविका, ज्योती चैनानी नगरसेविका, गजानन शेळके नगरसेवक, मंगल वाघे आरपीआय नगरसेवक, प्रमोद तळे पीआरपी नगरसेवक यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य – कांबा गाव, छाया बनकर सदस्य – कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनिसंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारिसंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रि ष्णानी, गजानन बामणकर, आंबू भिटजा, कमला क्रि ष्णानी आदींचा त्यात समावेश आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कलानी कुटुंबीयांसह अनेक नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे.

आणखी काही नगरसेवक प्रवेश करणार असून त्यामुळे एकूण नगरसेवकांची संख्या 32 होईल असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला
परंतु प्रत्यक्षात व्यासपाठीवर तीन ते चार नगरसेवकच उपस्थित होते. तर इतर नगरसेवकांच्या नातेवाईकांनी यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. याच मुद्यावरुन आव्हाड यांना छेडले असता, उर्वरीत नगरसेवक देखील येत्या काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षबंधीचा कायदा असल्याने आता नगरसेवक हजर राहू शकलेले नाहीत. परंतु येत्या काळात ते राष्ट्रवादीत दिसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी तसेच महापौर असेल असा विश्वास जितेंद्रा व यांनी व्यक्त केला.
भाजपमधून राष्ट्रवादीत ढेरेदाखल झालेल्या पंचम कलानी यांच्या खांद्यावर आता शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी येत्या काळात उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीचा नगरसेवक विराजमान होईल असा दावा केला आहे.

Most Popular

To Top