मुख्य बातम्या

सामाजिक न्याय विभाग अनुसूचीत जातीतील नव्वद हजार युवक युवतींना देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण – धनंजय मुंडे

 

सामाजिक न्याय विभाग अनुसूचीत जातीतील नव्वद हजार युवक युवतींना देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण – धनंजय मुंडे

बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती, एलआयसी आदी क्षेत्रात नोकरीसाठी मिळणार प्रशिक्षण; प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा स्टायपंड

बीड दि. 30 —- : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचीत जातीच्या युवक युवतींना शिक्षण प्रशिक्षण या माध्यमातून सक्षम करून त्यांना विविध क्षेत्रात उत्तम नोकरी व रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याच्या उद्देशाने राज्यात व्यापक स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या खात्याचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विभागाने या संबंधात अनेक क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना दिशादर्शक होईल असे आणि यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम आखला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

यामध्ये बँकिंग, रेल्वे, एलआयसी,
इत्यादि क्षेत्रातील नोकर्‍या तसेच पोलिस व मिलिटरी भरती आणि Aptitude Test वर आधारीत खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्कृष्ट नोकर्‍या करिता घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण राबविण्याकरिता दि. 28.10.2021 सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश काढला. बार्टी पुणे यांना हे प्रशिक्षण राबविण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात 30 प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण राबविले जाणार आहे. यामध्ये बँकिंग, रेल्वे, एलआयसी, इत्यादि परीक्षांचे प्रशिक्षण हे 6 महिने कालावधीचे असेल. हे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रती महिना रुपये 6000/- इतके विद्यावेतन (स्टायपंड) मिळेल. तसेच पोलिस व मिलिटरी भरती चे प्रशिक्षण हे 4 महिन्याचे असेल आणि त्यात देखील विद्यार्थ्यांना प्रती महिना रुपये 6000/- इतके विद्यावेतन (स्टायपंड) मिळेल. यामुळे विद्यार्थी हे जिल्ह्याच्या ठिकाणी रूम करून राहू शकतील आणि एकत्र वातावरणात अभ्यास करतील. पोलिस व मिलिटरी भारतीच्या विद्यार्थ्यांना यासोबतच बूट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता रु. 3000/- दिले जातील.

राज्यात प्रत्येक वर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून किमान 18000 विद्यार्थी प्रशिक्षीत केले जानार आहेत.

Most Popular

To Top