मुख्य बातम्या

पत्रकारांनो, तुम्हारा तो चुक्याच- प्रा.हरी नरके

पत्रकारांनो, तुम्हारा तो चुक्याच- प्रा.हरी नरके

काल एका समाजसेवक मामींनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या म्हणाल्या की नदी जागृतीसाठी त्यांनी गाणे गायले व जागतिक असे समाजकार्य केले. त्याचे कौतुक म्हणून मी टाळ्या वाजवते.. तुम्हीही वाजवा. पत्रकारांनी मामींचा हा आदेश मानला नाही, तर त्या संतापल्या व पत्रकारांना म्हणाल्या, ” तुम्हाला टाळ्या वाजवल्याच पाहिजेत” आणि त्या टाळ्या पिटु लागल्या. पण तमाम पत्रकार हे स्त्री, समाजकार्य आणि गायनकलाविरोधी असल्याने त्यांनी काही टाळ्या वाजवल्या नाहीत. पत्रकारांनो, तुम्हारा तो चुक्याच!

मी अशी शिफारस करतो की, मामींच्या या जागतिक कीर्तीच्या कामांबद्दल त्यांना नोबेल गेला बाजार भारत रत्न तरी प्रदान करण्यात यावे.

या गाण्याला पैसा पुरवणारा (निर्माता) ड्रगमाफिया सध्या गुजरातमध्ये तुरुंगात आहे. तो भाडोत्री (हायर केलेला) होता असा मामांनी खुलासा केला तर मामींनी अशा दुय्यमतीय्यम दर्जाच्या माणसाचे नाव काल श्रेय नामावलीतून हटवले. मामींनी अशा थूकरट माणसाबरोबर फोटो काढून घेतला तेव्हाची त्यांची देहबोली बघा. जो माणूस इतका तिय्यम होता त्याला अंगठा दाखवत मामी हसत फोटो काढतात? अनोळखी माणसाबरोबर मामी अशी पोज देतात? इतक्या खेटून उभ्या राहतात?

त्याने हे मामा मामींबरोबरचे फोटो दाखवून आजवर किती अधिकाऱ्यांकडून व राजकीय नेत्यांकडून बेकायदेशीर कामे करून घेतली असतील, त्याची गणती कोण करणार? त्याने त्यातून कितीपट नोटा छापल्या असतील? त्याची जबाबदारी कोणाची? मामामामींनी याची जाहीरपणे उत्तरे दिली पाहिजेत.

वस्तू भाड्याने आणतात, पैसा कर्जाऊ घेतात असे आम्ही समजत होतो. काल मामामामींमुळे आम्हाला नव्याने कळले की अर्थसहाय्य करणारा (निर्माता) माणूसच भाड्याने घेतात!

  • प्रा. हरी नरके

Most Popular

To Top