राजसाहेब ठाकरेंचे लाडके दिलीप बापू धोत्रे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ‘१०० नंबरी सोनं’!
(दादर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी पक्षाचे एकनिष्ठ शिलेदार श्री. दिलीप बापू धोत्रे ह्यांना ‘नेते’ पदाची जबाबदारी दिल्या नंतर त्या जबाबदारी ला सार्थ ठरवत दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, ज्यामुळे शहर असो की गाव, तेथे असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलीप बापूंच्या रुपानं एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे.
मनसे नेते श्री. दिलीप बापूंनी ‘नेते’ पद मिळाल्या नंतर सलग १०० दिवस न थांबता, न थकता उन, वारा, पावसाची पर्वा न करता अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचे नवचैतन्य आले आहे आणि प्रत्येकाच्या मुखातून एकद उद्गार निघतोय तो म्हणजे, ‘मनसेला मिळालं १०० नंबरी सोनं’!
मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते काल बापूंनी मागिल १०० दिवसात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी च्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. ह्या प्रकाशनाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच नेते व सरचिटणीस आवर्जून उपस्थित होते.