मुख्य बातम्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर राष्ट्रवादीचा विद्यार्थी चा झेंडा!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर राष्ट्रवादीचा विद्यार्थी चा झेंडा!

नाशिक,दि.२३ नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्रात करोनाच्या संकटा नंतर महाविद्यालये पुन्हा एकदा सुरू होण्यास सुरवात झाली आहे. तब्बल २ वर्षांनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी दाखल होत आहेत. त्यामुळे बंद असलेल्या विद्यार्थी चळवळी पुन्हा एकदा विद्यापीठ आवारात सुरू होणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

याचीच सुरवात आज नाशिक मध्ये झाली. आज नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर तीन सदस्य, एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे.

या विद्यार्थी परिषदेवर कायमच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. यंदाही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी नियोजनबद्ध काम करीत ही निवडणूक बिनविरोध करीत राष्ट्रवादीचे वर्चस्वच कायम ठेवल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे हे स्वतः नाशिक येथे हजर होते. यावरून राष्ट्रवादीने ही निवडणूक कीती गांभीर्याने घेतली होती हे दिसून येते. त्यांच्या सोबतच तेथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (वैद्यकीय) डॉ.श्रीराम शिवाजीराव रगड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर घुगे,राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय विभाग पुणे विभागीय उपाध्यक्ष डॉ. उमेश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष डॉ.सहर्ष घोलप, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष डॉ.अमोल धंदरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हा अध्यक्ष नंदन भास्करे, नाशिक शहराध्यक्ष गौरव गोवर्धने आदि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात महाविद्यालये सुरू होत आहेत. विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत. राज्यभर प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थी संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कंबर कसली असल्याचेच यावरून दिसून येते.

निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी अभिनंदन केले व येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठात व महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखा उघडून संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

 

Most Popular

To Top