शेतकऱ्याच्या विद्रोहाने MSEB ताळ्यावर
बीड : बारा दिवसापासून मनुबाईजवळा, काठोडा तांडा, गोळेगाव तांडा, सेलू येथील वीज पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी कट केली होती.
गावा गावातील व तांड्यावरील 70% लोक आज ऊस तोडीला बाहेर गेले आहेत. फक्त वयोवृद्ध लोक आज घरी आहेत. त्यांच्याजवळ लहान लहान नातवंड पतवंड आहेत. परंतु वीज नसल्याने 12 दिवसापासून प्यायला पाणी नाही, कुठं साप निघणे, कुठं चोरी होणे असे प्रकार वाढत चालले आहेत.
यामुळे आज जवळजवळ दोन तास तलवाडा- माजलगाव रस्त्यावर रास्तारोको केला. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमीका घेताच प्रशासन ताळ्यावर आले.
आंदोलन स्थळी बसल्या बसल्या तात्काळ वीज चालू करून घेतली. तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आले.हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि माय माऊलीच्या चरणी मी नतमस्तक होते.
युवा नेते गणेश चव्हाण, गोर सेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांचे आभार मानले.