मुख्य बातम्या

शेतकऱ्याचा महावितरणनेच केला खून ? पूजा मोरे यांचा आरोप

शेतकऱ्याचा महावितरणनेच केला खून; पूजा मोरे यांचा आरोप

बीड : विहिरीत पाणी असताना देखील 8 दिवसांपासून महावितरण ने वीज तोडली असल्याने लागवडीसाठी आणलेला कांदा सडून जात असल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील 23 वर्षीय कृष्णा गायके नावाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

या कुटुंबाची आज भेट घेतली. सांत्वन करण्याच्या पलीकडचे हे दुःख आहे. खर तर मागील दोन वर्षापासून पिक विमा नाही, खरिपाचे उत्पन्न नाही.अतिवृष्टीची मदत नाही. आमचेच शासनाकडे देणे बाकी असताना सरकार येणं रब्बीच्या तोंडावर सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. 12 दिवसापासून हे गाव अंधारात आहे. दिवाळी मध्ये देखील गावात वीज नव्हती. अस असताना शेतकऱ्याची उद्विग्न अवस्था होणं साहजिक आहे. त्यामुळे महावितरण वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ वीज वसुली थांबवून कट केलेले कनेक्शन जोडा नसता महावितरण ने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या अन्यथा कोणत्याही क्षणी महावितरण समोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांनी महावितरणला दिला आहे.

#आत्महत्यानव्हेहत्या

Most Popular

To Top