मुख्य बातम्या

सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. – प्रविण गायकवाड

सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार.
– प्रविण गायकवाड

आम्ही ना कधी शाहीस्तेशाही ऐकली ना अफजलशाही.
मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्या नोकरांच्या नावाने कोणतीही शाही निर्माण झाली नाही परंतु रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या शिवशाहीचे नोकर असणाऱ्या पेशव्यांची पेशवाई कशी काय होऊ शकते.
स्वतःची वस्त्रे ही सातारा छत्रपतींच्या दरबारात नतमस्तक होऊन ज्यांना घ्यावी लागत होती त्या पेशव्यांची पेशवाई कशी निर्माण होऊ शकते?
रणांगणातील रक्त पहिल्या पावसात वाहून गेले परंतु काळ्या शाईने लिहिलेल्या इतिहासाने शिवशाहीची पेशवाई केली.

जोपर्यंत छत्रपतींचे वारस गादीवर होते तोपर्यंत मराठे लढत राहिले. अजूनही महाराष्ट्रात छत्रपतींच्या गादीवर छत्रपतीच विराजमान आहेत आणि अजूनही प्रत्येक जण तिथे नतमस्तक होतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच आस्था आणि प्रेमही आहे.
विनाकारण कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीरावासोबत करून पेशवाई नावाचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.
गिरीश कुबेर यांच्या Renaissance of State या पुस्तकाचा सार पाहता लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संघर्षाच्या काळात मस्तानी प्रेमात अडकलेला बाजीराव पेशवा श्रेष्ठ होता आणि याचाच संदर्भ पकडून ते आजच्या राजकारणात शरद पवारांपेक्षा फडणवीसांची श्रेष्ठता मांडताना दिसतात. गिरीश कुबेर आपल्या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांना देशाचे भावी पंतप्रधान संबोधतात.
छत्रपती शिवरायांची तुलना बाजीरावाशी करून शरद पवार यांची तुलना फडणवीस बरोबर करण्याची क्लुप्ती या पुस्तकातून दिसून येते जी ब्राह्मणी वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच मांडलेली आहे.
गिरीश कुबेर हे लोकसत्ता सारख्या मराठी वृत्तपत्राचे संपादक असतानाही हे पुस्तक इंग्रजीतूनच का लिहितात कारण जगामध्ये इंग्रजी ही ज्ञानभाषा मानली जाते, इंग्रजी मध्ये लिहिले गेलेले पुस्तक हे प्रमाण मानले जाते. जेम्स लेनने ही Shivaji The Hindu King in Islamic India हे पुस्तक इंग्रजीतूनच लिहिले होते. इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीत करून खोटा इतिहास शिवप्रेमींच्या माथी मारण्याचे हे एक षडयंत्र आहे.

प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष- संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Most Popular

To Top