भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने प्रत्येक देशवासीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.अखेर वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली . त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
लता दिदींची न्यूमोनियाशी जुंझ अपयशी ठरली .केंद्र सरकारने या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यात दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.त्यांच्या निधनावर चित्रपटक्षेत्रासह, उद्योगक्षेत्र, राजकीय क्षेत्र, क्रीडा जगतातून मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्वीन ऑफ मेलोडी’ आणि ‘स्वर नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हणून लता दिदींची ओळख होती .आज संध्याकाळी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील.