नवी दिल्ली – 8 जानेवारी 2022 | चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली होती. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, १९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात केजरीवाल यांच्या आपला यश मिळालं नाही. त्यामुळे, चंदीगडमध्ये सर्वात मोठा पक्ष असतानाही आम आदमी पक्षाचा महापौर झालाच नाही. येथे भाजप नेते विनोद तावडेंच्या प्रभारी नेतृत्वात भाजपचा महापौर बनला.
विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये ‘आप’ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर
By
Posted on