पुणे :अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार २०२२ जि.प.शाळा.चंदनवाडीचे गुणवंत आदर्श शिक्षक विकास गोरक्षनाथ रासकर यांना पुरस्कार प्राप्त ,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला 54 वे राज्यस्तरीय अधिवेशन निमित्त राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार 2022 ISO जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे याचे आदर्श व गुणवंत शिक्षक श्री. विकास गोरक्षनाथ रासकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करताना श्री पन्नालाल सुराणा, अध्यक्ष लालासाहेब पाटील, प्रमुख कार्यवाह शामराव कराळे, कार्याध्यक्ष मोहन सावंत, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला चे ग्रामीण अध्यक्ष श्री बाळासाहेब कानडे व सौ.मनीषा कानडे उपस्थित होते. तसेच शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र सुनील सानप शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून बाल पिढी घडवणे त्यांचे व्यक्तिमत्व विकास करणे याची मोलाचे योगदान देण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेला पवित्र मंदिर मानून त्याची सेवा करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
