व्यक्ती विशेष

*वंचित व दुर्बल घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे असेही एक संस्थाचालक म्हणजेच सागर उल्हास ढोले पाटील सर..

शिक्षण हक्क कायदा( Right to Education)
1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला या कायादयन्वये
हा अधिनियम, 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य करण्याबरोबरच प्राथमिक शाळेसाठी
सर्व खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक केले. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेशही शासनाने सर्वांना दिले परंतु आर.टी.ई अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची वास्तव परिस्थिती विचारात घेतली तर शासन आणि शिक्षण संस्था यांच्यामध्ये समन्वय साधला जात नाही त्यामुळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो शासनाकडून आवश्यक असणारी RTE विद्यार्थ्यांची फी शाळेला मिळाली नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांनी वेठीस धरले. तसेच दुजाभाव केल्याचे व मुले घरी पाठवल्याचे ची उदाहरणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु या सगळ्या गोष्टींना छेद देत.. माणुसकीचे उदाहरण दाखवणारे संस्थाचालक म्हणजे ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील…. आर टी. ई मध्ये ऍडमिशन झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि तशा सूचना प्रिन्सिपल आणि शिक्षकांना दिल्या.. आर टी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण खेळ त्याचबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास अशा विविध गोष्टींवर पालकांशी सागर ढोले पाटीलसर यांनी संवाद साधला सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ढोले-पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील व या विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही असा शब्द सरांनी पालकांना दिला. “सर आपण आमच्या घरी आलात आमचा विश्वासच बसत नाही की असेही समाजामध्ये घडू शकते की एक शाळेचे संस्थाचालक आमच्या घरी येऊन आमच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याची एवढी काळजी घेतात नक्कीच आमच्या मुलांचं भाग्य आहे की आमची मुलं आपल्या एवढ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत. आपल्या स्वभाव वरूनच आम्हाला कळते की शाळेमध्ये वातावरण कसे असेल आमच्या मुलांचे भविष्य नक्कीच चांगले असणार आहे. आपली शाळा बघूनच आमची मुलं खूप खूश झालेली आहेत असे मत पालकांनी व्यक्त केले” सर्व पालकांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला एखाद्या शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालकच प्रत्यक्ष आपल्या घरी भेट द्यायला येतात आणि आपल्या मुलाच्या भवितव्यावर पालकांशी संवाद साधतात हे त्यांच्यासाठी खूपच सुखद गोष्ट होती. सर्व पालकांनी सरांचे औक्षण करून ओवाळून स्वागत केले. प्रत्येक संस्थाचालकांनी जर असा दृष्टिकोन ठेवला तर खऱ्या अर्थाने समाजातील दुर्बल घटकांपर्यंत व वंचित घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचेल व त्याच्यातून शैक्षणिक क्रांती होईल भारत देशाची सु संस्कृत पिढी घडेल.

Most Popular

To Top