बारामती
विद्या प्रतिष्ठानच्या कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने एलईडी दिवे तयार करणे या विषयी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अविनाश रोकडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ रोकडे सरांनी यावेळी सादरीकरणाच्या माध्यमातून एलईडी, पीसीबी डिझाईन, एलईडी ड्राइव्हर, सोल्डरींग, कॉम्पोनंट फिटिंग, इलुमिनेशन टेस्टिंग इत्यादि मूलभूत संकल्पनाची माहिती दिली. विद्यार्थ्यानी प्रश्र्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधला.
शाश्वतऊर्जानिर्मितीसह उर्जाबचतही अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. पदार्थविज्ञान विभागातर्फे अशा कार्यशाळा दरवर्षी घेतल्या जातात. विद्यार्थ्याही अशा प्रशिक्षण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद देतात. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ प्रदीप पाटील यांनी कार्यशाळेचा हेतू विशद केला आणि एलईडी बल्ब तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून विदयार्थी स्वतः व्यवसाय देखील करू शकतील असेही आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, डॉ प्रदिप पाटील व विभागातील शिक्षक
उपस्थित होते. कार्यशाळेचत १३० विद्यार्थ्यानी स्वतः एलईडी बल्ब निर्मितीचा आनंद घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना प्रशिक्षण प्रमाणपत्रे देण्यात आली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. महेश वेदपाठक डॉ रमेश देवकाते डॉ जयश्री चिमणपुरे तसेच विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात एलईडी दिवे तयार करणे या विषयी कार्यशाळा संपन्न
By
Posted on