माझा जिल्हा

मा. राजसाहेब ठाकरेंच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मनसे कसबा विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

नवी पेठ : दिनांक १४ जून रोजी सन्मानीय हिंदुजननायक मा. राजसाहेब ठाकरेंच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मनसे कसबा विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.

सर्वप्रथम राजसाहेब यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी पुण्यातील मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील शारदा गणपती मंदिरात अभिषेक केला. राज ठाकरेंच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त मनसे कसबा विभागातर्फे अखिल मंडई मंडळ येथे सुप्रसिद्ध शारदा गणपती महाआरती व 550 नारळाचे तोरण अर्पण करण्यात आले.ह्या कर्यक्रमाचे आयोजन वसंत खुंटवड, सारंग सराफ, अजय राजवाडे, रवी सहाणे, अभिषेक थिटे ह्यांनी केले.
समस्त नागरिकांना लाडू वाटप करून नागरिकांचे तोंड गोड केले. ह्याचे नियोजन तेजस माने, प्रवीण शिरसागर, गणेश भोकरे आणि मनसे कार्यकर्ते ह्यांनी केले.
५४ दिव्यांग मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले त्यानंतर भोजनाचा आस्वाद ह्या दिव्यांग मुलांनी घेतला. ह्याकार्यक्रमाचे आयोजन विशाल ओदेन ह्यांनी केले होते आणि कार्यक्रमास वसंत खुंटवड अजय राजवाडे, सारंग सराफ,रवी सहाणे, राजेंद्र कामठे, स्वप्नील, हृषीकेश ह्यांनी सहकार्य केले. तसेच मनसे नेते अनिलजी शिदोरे, उपाध्यक्ष गणेश अप्पा सातपुते, नरेंद्र तांबोळी, विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, संघटक निलेश हांडे, महिला उपाध्यक्ष जयश्री पाथरकर, महिला विभाग अध्यक्ष निताताई पालवे, मा नगरसेविका तिकोने ताई, उषाताई काळे आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी पेठ – दत्तावाडी येथे वृक्ष वाटप करण्यात आले.ह्याचे नियोजन शंतनू उभे, राम सरवदे, अजय राजवाडे ह्यांनी केले.

Most Popular

To Top