माझा जिल्हा

बीड-परळीतील संस्कारच्या हळदीकुंकू कार्यक्रमात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा देखावा..

बीड-परळी :- “विद्यानगर विभागात महाराष्ट्रीयन थीम घेऊन हळदी- कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न”

परळी (प्रतिनिधी)- विद्यानगर विभागात संस्कार प्राथमिक शाळेत हळदी -कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मावती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. माधुरी तांदळे मॅडम, प्रमुख पाहुण्या म्हणून कृषी अधिकारी सौ. जयश्री कवडे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कर्तृत्ववान व्यक्तीचे शाळेचे संस्थापक परळी भूषण आदरणीय विठ्ठल रावजी तांदळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


शाळेतील लहान चिमुकल्यांनी डंबेल्स उत्कृष्टरित्या सादर केले. तसेच ६ व ७ वी च्या विद्यार्थिनींनी टिपऱ्या नृत्य सादर केले. तसेच इयत्ता ७ वी च्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचे लावणी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित पालक पालकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. तसेच, उपस्थित असलेल्या महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेण्यात आली . एका मिनिटांमध्ये जास्तीत जास्त उखाणे घेणाऱ्या महिलांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दरम्यान कृषी अधिकारी सौ. जयश्री कवडे मॅडम यांनी शाळेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी या म्हणाल्या की, संस्कार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर अस्सल मराठी आणि महाराष्ट्रीयन संस्कार दिसून येतात.

या हळदीकुंकू कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्रीय संस्कृती अशी होती यामध्ये मुलांनी महाराष्ट्रीयन खेड्यातील झोपडी , शेती ,चूल, उखळ, मातीची भांडी , जातं आदींचे हुबेहूब दर्शन मांडण्यात आले होते यातून जुन्या व महाराष्ट्रीयन संस्कृतीला उजाळा देण्यात आला. आजच्या आधुनिक सेल्फीच्या नादामध्ये दिसते आहे. महाराष्ट्रीयन रूढी – परंपरा विसरली आहे. त्यांना बोध व्हावा या हेतूने ‘ महाराष्ट्रीय संस्कृती ‘ संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडले होती. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित पालक पालकांनी तसेच शिक्षक विद्यार्थ्यांनी एकमेकांना वाण व तिळगुळ देत मोठ्या उत्साहात हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी आदिवासी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Most Popular

To Top