माझा जिल्हा

विद्यानगर येथे संस्कार प्राथमिक शाळाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- विद्यानगर येथे संस्कार प्राथमिक शाळेचे दि.४ फेब्रुवारी रोजी लहान बालकांच्या उत्साह व त्यांच्या कला गुणांचा मधूर संगम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले असुन आरोग्य विभागचे कक्ष अधिकारी विष्णू आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संमेलनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार प्राथमिक शाळा यांनी केले आहे.
पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा,विद्यानगर वार्षिक स्नेहसंमेलन ~2023 भव्य दिव्य रंगमंच, झगमगटुन टाकणारा प्रकाश, उत्कृष्ट संगीत व्यवस्था भारतीय संस्कृतीची वारसा सांगणारी गीते, देशभक्तीपर गीतांचे मैफिल , पोशाखांची रंग संगती या स्नेह संमेलनात नागरिकांना ,पालक ,- पालकांना विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. चला तर मग… संस्कार प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याची संधी दवडू नका! बालकलाकारांचा जल्लोष आणि संगीतमय गीतांची सांस्कृतिक मेजवानी पाहण्यासाठी संस्कार प्राथमिक शाळा आपणास आमंत्रित करीत आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागचे कक्ष अधिकारी विष्णू आव्हाड यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, के एस एस महाविद्यालयाचे सचिव आशिष अंधारे, मानसी स्किल इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा.उमेश पतंगराव, तालुका आरोग्य अधिकारी परभणी डॉ. रावजी सोनवणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार, दि.०४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता श्री शंभू महादेव मंदिर समोर विद्यानगर परळी वैजनाथ येथे हे वार्षीक स्नहेसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी व पालक तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी  आपल्या शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सह-कुटुंब  सहपरिवार  उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षिकोत्तर कर्मचारी संस्कृत प्राथमिक शाळा विद्यानगर विभाग परळी वैजनाथ यांनी केले आहे.

Most Popular

To Top