महाराष्ट्र

भाजपाचं सरकार नेभळट, पंतप्रधानांना ‘मन की बात’ सांगत येते ‘शेत की बात’ ऐकता येत नाही

भाजपाचं सरकार नेभळट, पंतप्रधानांना ‘मन की बात’ सांगत येते ‘शेत की बात’ ऐकता येत नाही

बीड (रिपोर्टर): – मनमोहनसिंह सरकारच्या काळामध्ये ६५० कोटी रुपये किंमत असलेलं राफेल विमान मोदी सरकारने १६५० कोटी रुपयांत खरेदी केलं, यावर काहींनी माझ्या बाबत अपप्रचार केला. मी समर्थन केलं, असं म्हटलं, परंतु मी त्याचं समर्थन केलं नाही, असं स्पष्ट करतो, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी त्या विमानाने हल्ले कसे करायचे हे सांगू नका, परंतु किमतीची माहिती द्या, बोफोर्स प्रकरणात स्व. राजीव गांधी चौकशीला सामोरे गेले, तुम्ही चौकशीला सामोरे का जात नाहीत? असा सवाल करत पवारांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर आसूड ओढले. देशात भाववाढ होत आहे, इंधन दरवाढ होत आहे, खुलेआम सैनिकांची हत्या केली जात आहे. हे सरकार नेभळट आहे, आता ज्याच्या मनगटात रग आहे अशांच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन या वेळी पवारांनी केले. ते बीड येथे आयोजित विजयी संकल्प मेळाव्या दरम्यान बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सतीश चव्हाण, विक्रम काळे, माजी आ. अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, उषाताई दराडे, सुभाष राऊत, माजी आ. सय्यद सलीम, संदीप क्षीरसागर, उषाताई दराडे, सुभाष राऊत, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात जिल्ह्याची राज्याची आणि देशाची सत्ता आहे ते सर्व गोष्टींवर मागे सरकले आहे. केवळ जाती-पातीच्या उकाळ्यात सरकार काम करत असल्याने समाजातले सर्व घटक अस्वस्थ आणि दुखी आहेत.

केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. साठ टक्के लोकंची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. ६० टक्के मतदार हा शेतकरी आहे. त्या शेतकरी वर्गालाच केंद्र आणि राज्य सरकारने दु:खी केलं आहे. समाजातील सर्वच घटक सरकारच्या कामकाजावर दु:खी आणि कष्टी झालेल्या आहेत. दहशतवादीही आपल्या सैनिकाला मारत आहेत. राफेल विमानातही केंद्र सरकारने हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नेभळट सरकारे असून अशा नेभळट सरकारांना उलथून टाकण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे, असे म्हणत येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या नेभळट सरकारला उलथवून टाकून मनगटात रग असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारला निवडून दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थपाक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बीड येथील आयोजीत विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना केले.

सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते, मात्र केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात समाजातल्या कोणत्याच घटकाला सुखी केलेले नाही. आज सोयाबीन करपून गेले आहे, कापूस वाळला आहे, तर उसाला हुमनी लागली आहे. अशा वेळेस राज्याच्या मंत्रिमंडळाने मराठवाड्यात औरंगाबादला बैठक घेऊन शेतकर्‍यांच्या दुष्काळ निवारणासाठी योजना आखून शेतकर्‍यांचे अश्रू पुसले पाहिजेत. ज्यांच्या जिवावर आपण सत्ता उपभोगत आहोत अशा शेतकरी आणि कष्टकरींना हे सरकार दुखी करत आहे. दिनदलितांच्याही कोणत्याही योजना या सरकारने राबवलेल्या नाहीत. आत्महत्येचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना सरकारने केलेली नाही. सरकारच्या सर्व घोषणा फसवल्या असून राज्य सरकारची कर्जमाफी घोषणा ही अत्यंत फसवी असून शेतकर्‍यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बँकांना कर्जमाफी देताना देशात सरसगट कर्जमाफी दिली तशीच कर्जमाफी या सरकारने का दिली नाही, असा प्रश्‍न उपस्थित करूएन बोफोर्सप्रकरणी ज्या पद्धतीने चौकशी झाली त्या पद्धतीने राफेल विमान प्रकरणाची चौकशी व्हावी.

सरकार सर्वसामान्यांची लूट करत असून देशाच्या इतिहासात बेरोजगारांच्या संख्येत या सरकारच्या काळात वाढल्याचे सांगितले. पंतप्रधान मन की बात सांगतात, शेतकी बात ऐकत नाहीत, लोकांची बात ऐकत नाहीत, त्यांना ऐकायची सवय नाही. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणले, चार वर्षे उलटून गेले तरी आरक्षण नाही. मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण नाही. आता वेळ आली आहे, सत्तेचा गैरवापर करणार्‍यांना तुमचे दिन भरले आहेत, असं म्हणण्याची. बीड जिल्ह्याने मला कायम साथ दिली. काकुंनी नेहमी सहकार्य केलं. सुंदरराव, द्वारकादासजी, रामराव, शिवाजीराव, यांच्यासह कित्येकजण माझ्या पाठिशी खंबीर उभे राहिले आहेत. जसे तुम्ही माझ्या पाठिशी उभे आहेत, तसेच मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील. जिल्हा मध्यवर्ती बँकेने धनंजयंवर कुभांड आखलं, असेही ते म्हणाले.

Most Popular

To Top