कृषी दिनानिमित्त आमदार माणिकराव कोकाटे यांची शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नांतून मुक्त करत एक अनमोल भेट
नशिक : दिनांक १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नांतून मुक्त करत एक अनमोल भेटच या निमित्ताने दिली आहे. शहा येथे झालेल्या १३२ के व्ही विज उपकेंद्राला व वावी, पाथरे येथील ३३ के व्ही विज उपकेंद्राना जोडणारी सुमारे दिड कोटी रुपयांच्या ३३ के व्ही विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाल्याने कृषी दिनाचे औचित्य साधत आमदार माणिकराव कोकाटे यांनी असंख्य शेतकरी व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.
ह्या विद्युत वाहिनीने केवळ वावी व पाथरे हे उपकेंद्र जरी जोडले जाणार असले तरी त्याचा परिणाम हा संपूर्ण सिन्नर मधील विजेचा ताण तर कमी होणारच आहे मात्र त्याच बरोबर जिल्ह्यातील देखील नॅशनल ग्रीड च्या विद्युत वाहिनीचा ताण कमी होवून ब्रेक डाऊन चे प्रमाण कमी होणार आहे.