मुंबई, दि. ६ : मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ७ जुलै २०२३ पासून करता येणार आहेत.
या भरती प्रक्रियेबाबतच्या सविस्तर तपशिलासह जाहिरात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.७ जुलै २०२३ रोजी पासून उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. ७ जुलै २०२३ (दुपारी १२.०० वा. पासून) ते २१ जुलै २०२३ रोजी (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत करता येतील, असे मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.