करमाळा : महायुतीचे सरकार असताना आमदार रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रो सोबत आदिनाथ चा करार झाला होता. आदिनाथ पवारांच्या हातात जाईल अशी परस्थीती निर्माण झाली होती. त्यावेळेस आदिनाथ बचाव या नावे संघटना स्थापन करून पहिल्यांदा पत्रकार महेश चिवटे यांनी आवाज उठवला त्यानंतर रामदास झोळ, डांगे,बिले, बदे वगैरे मंडळीने चिवटे यांना साथ दिली.
आदिनाथ बचाव साठी गावोगावी सभा होत असताना तालुक्यातील आमदार संजय शिंदे, नारायण पाटील, बागल जगताप वगैरे मंडळी आदिनाथ च्या बाबतीत उघड पणे भुमीका घेयला तयार नव्हते मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपा सोबत सरकार स्थापन केले .त्यानंतर आदिनाथ बचाव चळवळीस बळ आले.पुढे चिवटे हे अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले जिल्हाप्रमुख देखील झाले.
राज्यात सत्तांतर होताच पवारांसोबत राजकीय हाडवैर असलेले मंत्री तानाजी सावंत देखील अॅक्टिव्ह झाले माजी आमदार नारायण पाटील रश्मी बागल यांना एकत्रित घेऊन त्यांनी स्वतःचे पैसे आदिनाथ मध्ये गुंतवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदिनाथ च्या गव्हाणीत मोळी टाकून आदिनाथ चालू केला .मात्र मोळी पुजनाच्या पहिल्याच सभेत आदिनाथ बचाव साठी पुढाकार घेणाऱ्यांना बेदखल केले बोलण्याची संधी देखील दिली नाही . आदिनाथ सुरु होण्याचे सर्व क्रेडिट नारायण पाटील यांना भेटल्याचे चित्र या सभेत निर्माण झाले होते.यावेळेस बोलताना तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी पवार घराण्यावर ताशेरे ओढले होते आदिनाथ गिळंकृत करण्याचा पवारांचा डाव होता असे आरोप केले होते.
आदिनाथ च्या निवडणुका लागतील असा अंदाज असताना तानाजी सावंत यांनी आपली पावर दाखवून कारखान्यावर प्रशासक आणला. या घडामोडीत मात्र सावंत यांनी पाटील व बागल गटाच्या नेतृत्वाला फारसे विश्वासात न घेता नारायण पाटील बागल यांना डावलून आपला विश्वास संपादन केलेले महेश चिवटे यांच्यासह आणखी एकाला प्रशासक मंडळात सल्लागार केले.
नवीन प्रशासक मंडळचा सत्कार करत असताना बचाव समितीचे सदस्य हरिदास डांगे समोर आले . डांगे हे पूर्वाश्रमीचे आमदार संजय शिंदे यांचे विश्वासू असल्याने त्यांना पहाताच तानाजी सावंत यांच्या चेहर्यावरील भाव बदलले हे असले लोक कशाला आणले? आत्ता आदिनाथ ची वाट लावायची का ?असा सवाल केला होता.वरवर हा डांगेवर काढलेला राग दिसत आसला तरी या रागाला शिंदे बंधू व सावंत बंधूंच्या राजकीय हाडवैराची किनार होती हे प्रकर्षाने दिसत होते.
सध्या राज्यात पुन्हा नव्याने सत्तेचे समीकरण झाले असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. या समिरकणात शरद पवार रोहीत पवार सोबत नसले तरी आदिनाथ वर्चस्व मिळवू पहाणारे आमदार संजयमामा शिंदे मात्र अजित पवार यांच्या सोबत आहे .तानाजी सावंत यांना शह देण्यासाठी ते देखील प्रयत्नशील असतात त्यातच सावंत व पवार यांचे देखील संबंध नेहमीच ताणलेले असतात
सध्या आदिनाथ कारखान्यावर प्रशासक असून मागील हंगामातील उस उत्पादक शेतकऱ्यांसह वाहतूक दारांची देणी कामगारांची देणी हे प्रश्न सुटलेले नाहीत , अशा परिस्थितीत राज्यातील नव्या राजकीय समीकरणचा आदिनाथ च्या कारभारा मध्ये काय हस्तक्षेप होतो का?
हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.