बेधडक

गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बळकविणाऱ्या विरोधात पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा

गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बळकविणाऱ्या विरोधात पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा

सर्वांनी मोर्चात सहभागी होवून न्याय देण्याचे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समिती चे आव्हान

औरंगाबाद : सर्वसामान्य ठेवीदारांचे तब्बल २०० कोटी हून जास्त रुपयांचा महाघोटाळा करून कोट्यवधी रुपये बळकविणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालका विरोधात उद्या दिनाक १७ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता क्रांती चौक ते थेट पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पतसंस्थेत शहरासह तालुक्यातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे शेकडो रुपये अडकले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला मिळतील असे सांगून केवळ भूलथापा दिल्या गेल्या.
गोरगरीब, कष्टकरी, वयोवृध्द नागरिक तसेच शेतकरी बांधवांना त्यांच्या आयुष्याची जमापुंजी मिळवून देण्यासाठी सर्वांनी पक्ष भेदभाव विसरून धडक मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे.

Most Popular

To Top