महाराष्ट्र

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे उद्घाटन स्थगित..

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे उद्घाटन स्थगित

आज सायंकाळी ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे उपस्थित राहणार होते. परंतु मुंबई, ठाणे परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सदर उद्घाटनाचा कार्यक्रम आज स्थगित करण्यात आला आहे. व्य़थित अंतःकरणानं आजचा कार्यक्रम स्थगित केला असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय अजितदादांसह आपण उपस्थित राहणार असल्याची ग्वाही मा. प्रदेशाध्यक्षांनी दिली.

दरम्यान, मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट असल्याने ठाणेकरांनी काळजी घ्यावी आणि गरजेनुसारच घराबाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Most Popular

To Top